A2 Milk

गोपालनाचे अर्थकारण!

‘गोपालनाकडे चला’ हा लेख वाचल्यानंतर भरघोस प्रतिक्रिया आल्या. त्यांपैकी कित्येकांनी या क्षेत्राविषयी, त्यातील आव्हानांविषयी अधिक माहिती घेण्यास आवडेल आणि याबाबत आपण लिहावे; अशी विनंती केली. कोणत्याच प्राण्याला सांभाळणे हे म्हणावे तसे सोपे नाही. त्याचा स्वभाव, खाणं पिणं, आरोग्य, सामाजिक जीवनाची प्रवृत्ती हे सारे लक्षात घेऊन काम करावे लागते. त्यातच देशी गायींची काळजी घेणे हे तर सर्वार्थाने आणखी कठीण काम. केवळ व्यवसाय म्हणून गोपालनाकडे न पाहता उत्तम बीज आणि अपत्यपरंपरा निर्माण करण्यास या क्षेत्रात खूप महत्त्व आहे. गोपालनात सहभाग नोंदवताना मी ज्या गीर नामक गायीच्या प्रजातीशी संबंधित आहे; तीत काम करताना त्यांचे उपप्रकार, लक्षणे इ. देखील लक्षात घ्यावी लागतात. हीच बाब थोड्या बहुत फरकाने अन्यही प्रजातींना लागू होते. या साऱ्यांचे डॉक्युमेंटेशन हे येणाऱ्या काळाची गरज आहे. तसे काम विविध ठिकाणी सुरुदेखील आहे. कपिला ते सुवर्ण कपिला आणि पांढरी गीर ते कृष्णवर्णी गीर (आयुर्वेदात गायीच्या वर्णानुरूप तिच्या दुधाचे गुणधर्म कथन करण्यात आले आहेत; प्रत्यक्ष काम करताना त्यांच्या नक्कीच प्रत्यय येतो.) अशा विविध उपप्रजाती नीट पारखून आपल्याकडे सांभाळणे हे आव्हानात्मक काम. त्यातही यांतील कित्येक दुभत्या नसताना वा भाकड झाल्यावरही सांभाळणे हे आणखी वेगळे आव्हान. ही सारी आव्हाने तुमच्या आमची टीम यशस्वीरीत्या हाताळत आहे. गोरक्षण म्हणजे गायी सोडवून आणणारे गोरक्षक, गोपालन करणारे गोपालक-शेतकरी, गायींची निगा राखणारे, गोउत्पादने खरेदी करणारे असे बृहद् कुटुंब असते! या क्षेत्रातले बारकावे, सत्यस्थिती माहिती नसल्याने अनेकदा ‘इतकं महाग दूध/तूप?’ असे प्रश्न विचारले जातात. कित्येकदा स्वतः देशी गाय न पाळताच वा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गोपालनात कोणताही सहभाग नसलेले लोक या क्षेत्राबाबत अकारण गैरसमज पसरवत असतात तेव्हा यातील बहुविध स्तर उलगडून दाखवावे लागतात. त्यांच्यासाठी नव्हे…..खरोखरच ‘अथातो जिज्ञासा’ असणाऱ्या सामान्य जनतेसाठी; यासाठीच हा लेखप्रपंच. देशी गायीचे दूध वा तूप बाजारातील अन्य याच गटातील पदार्थांपेक्षा महाग असते हे आपल्याला बऱ्याचदा ठाऊक असते. मात्र तसे होण्यामागील कारणांचा विचार आपण बहुतेक वेळा करीत नाही. इतकेच नव्हे; तर आपण कुठल्या दोन गोष्टींची तुलना करत आहोत याचाही विचार अनेकदा आपल्या मनामध्ये नसतो! देशी गाईच्या दुधात मेदाचा अंश हा अत्यंत नगण्य असतो जेमतेम ४-४.५% इतक्याच प्रमाणात तो आढळून येतो. यामुळे हे दूध जरी पचायला हलके असले तरी त्यापासून तूप तयार करण्याकरता लागणारा ऐवज हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास ९% फॅट असणारे म्हशीचे दूध वा फुल क्रीम दूध यांच्यामार्फत तूप बनवत असता जे काम जेमतेम दहा लिटर दुधाच्याही आत शक्य होते तेच देशी गायीच्या दुधापासून तूप निर्माण करत असतात जवळपास २५ ते ३० लिटर दुधापासून एक लिटर तूप उत्पन्न होऊ शकते! दूध वा तुपाकरता पालन केल्या जाणाऱ्या गाईंची काटेकोरपणे काळजी घेणे अत्यावश्यक असते.
अशा परिस्थितीमध्ये सरासरी एका गायीचा आहार, औषधे, मनुष्यबळ असा सारा खर्च दिवसाला सरासरी तीन-चारशे रुपयांपर्यंत जाऊ शकतो. गाईंना स्वतःच्या घरातील सदस्याप्रमाणे वागवणारे गोपालक त्यांच्या खाण्यात कुठलीही कसर ठेवत नाहीत. वेळोवेळी चाऱ्या बरोबरच ऊस व मक्याचे भांड, गुळाची ढेप, खनिजे कमी पडू नयेत यासाठी सैंधव इत्यादींचा वापर केला जातो. या साऱ्या आहाराबरोबरच सकस दूध बनण्याकरता धान्यांच्या मिश्रणाचा शिरा बनवून त्यांना खायला घातला जातो. वर नमूद केलेली रक्कम ही इतकी का? याचे उत्तर आपल्याला मिळाले असेल. लक्षात घेण्याची बाब अशी की गोशाळेत असलेल्या सगळ्याच गायी दुभत्या असतील असे नव्हे. किंबहुना कित्येक गायी या भाकडदेखील असतात. त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या खर्चातून प्रत्यक्षात गोपालकांना कुठलाही परतावा मिळण्याची शक्यता नसते. तरी कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना घरातल्या सदस्याप्रमाणे अखेरच्या श्वासापर्यंत जपले जाते. थोडक्यात त्यांच्यावर केला जाणारा खर्च हा निव्वळ खर्च असतो! एका गाईकडून दिवसाला सरासरी पाच ते सात लिटर दूध मिळते. दुधाचे भरमसाठ उत्पन्न घेण्याच्या नादात ऑक्सिटोसीनसारखे हॉर्मोन्स टोचण्याचे अमानवी प्रकार इथे होत नाहीत. त्यातच भारतीय तत्त्वांवर चालणाऱ्या गोशाळांत बछड्यांना दूध देऊन त्यानंतर मग उर्वरित दुधाचे वितरण वा तुपामध्ये रूपांतर केले जाते. हे संपूर्ण अर्थकारण लक्षात घेतल्यास दुधाला सरासरी ८० ते ९० रुपये प्रति लिटर तर तुपाला सरासरी अडीच हजार रुपये प्रति लिटर असा बाजार भाव का लावला जातो याचे कारण आपणास सहज उमगेल. हे तूप आयुर्वेदाला अपेक्षित असलेल्या गुणधर्मांनी युक्त असलेले असते. डेअरी इंडस्ट्रीमध्ये हे तयार होणारे तूप हे मुळात जो फॅटचा अंश कायदेशीररित्या दूध विकत असता त्यामध्ये ठेवणे योग्य नसते; त्याला घुसळून बाजूला काढून निर्माण झालेल्या क्रीमला हिट जॅकेटमध्ये घालून अथवा सेंट्रीफ्यूज करून वितळवून तयार केलेले असते. याला तूप नव्हे तर ‘बटर ऑइल’ अशी संज्ञा आहे. केवळ कोलेस्ट्रॉल असलेल्या अशा या बटर ऑईलच्या किमतीची तुलना विरजण लावून, ताक घुसळून, लोणी कढवून पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या आणि अमृतासमान असलेल्या देशी गाईच्या तुपाबरोबर आपण करत असल्यास आपण पितळेला सोन्यासह तोलत आहोत. त्यातही हे सारे अर्थकारण नीट लक्षात घेतल्यावर प्रत्यक्षात हा दर लावूनही हा फायद्याचा व्यवसाय होणार नाही हे सूज्ञ वाचकांच्या ध्यानी आले असेलच! तो तसा करण्यास त्याला सेंद्रिय शेतीची जोड द्यावी लागते. गोपालन आणि शेती हे परस्परपूरक व्यवसाय असून काळाची गरज आहेत. शेतकरी बांधवांनी याचा जरूर विचार करावा. शेतकरी नाहीत त्यांनी; शहरातील अगदी सामान्य मध्यमवर्गीय माणसांनीदेखील आपले चार डोक्यांचे कुटुंब महिन्यातून दोनदा हॉटेलमध्ये गेल्यावर होणाऱ्या खर्चापेक्षाही कमी खर्चात महिन्याचे अस्सल तूप येते हे लक्षात घ्यावे. घरीच तूप बनवताना ते देशी गायीच्या दुधापासून बनेल याकडे लक्ष द्यावे. हे सारे सहज शक्य आहे. मी स्वतः माझ्या घरापासून याबाबत सुरुवात केली, देशी गाय या विषयावर सतत अभ्यास केला. या मार्गाने आज माझे कित्येक रुग्ण,परिचितही गोपालनाशी जोडले गेले आहेत. गोपालक-शेतकऱ्यांची एक उत्तम टीम सोबत असल्याने ही मला गवसलेल्या मार्गाची सुरुवात आहे; आणखी बरंच काही करायचं आहे. नकारात्मकता पसरवणाऱ्या व्यक्तींच्या नादी लागून देशी गायींचे पालन करणाऱ्यांवर आक्षेप घेत बसण्यापेक्षा आपणही या कार्यात कसे सहभागी होऊ शकाल याचा विचार करून पहा. त्यातच आपण, आपले कुटुंब, समाज आणि पर्यायाने देशाचे भले आहे!!
–वैद्य परीक्षित शेवडे Source: – Facebook post from Vaidya. Pareexit Shevde

15 thoughts on “गोपालनाचे अर्थकारण!

  1. Next time I read a blog, Hopefully it does not disappoint me as much as this one. I mean, I know it was my choice to read, however I truly believed you would have something useful to say. All I hear is a bunch of crying about something that you could possibly fix if you werent too busy looking for attention.

  2. Good post. I learn something totally new and challenging on blogs I stumbleupon on a daily basis. Its always useful to read content from other authors and practice something from their websites.

  3. HenryNug says:

    safe list of darknet market links french deep web link

  4. Bryanvache says:

    Regular boiler servicing is crucial for maintaining optimal functionality and extending the lifespan of your heating system. https://zeef.com/profile/xavier.campbell/ – Leaks…

  5. gosurani says:

    Пожалуйста узнайте о фильме и посмотрите Смотреть фильмы бесплатно государственная граница интересно: Часть солдат пресекает попытку толпы прорваться сквозь линию границы, а вторая принимает боевую готовность, наглядно демонстрируя немцам, что будет если те осмелятся открыть огонь

  6. Lavillkerma says:

    [url=https://labstore.ru/catalog/belki-peptidy/mbs-mbs1166588-m-1/0,05-mg/]MBS-MBS1166588-M | Labstore [/url]
    Tegs: LAT3 Antibody, unconjugated, rabbit, Polyclonal | Labstore https://labstore.ru/catalog/antitela-3/lat3-antibody-unconjugated-rabbit-polyclonal-6/100-mkl/

    [u]DDHD2 antibody, unconjugated, rabbit, Polyclonal | Labstore [/u]
    [i]TRPV2, NT (TRPV2, VRL, Transient receptor potential cation channel subfamily V member 2, Osm-9-like TRP channel 2, Vanilloid receptor-like protein 1) (MaxLight 550), rabbit, Polyclonal | Labstore [/i]
    [b]Porcine Melanoma Derived Leucine Zipper Extra-Nuclear Factor ELISA Kit | Labstore [/b]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *